भारत कधीच 'महासत्ता' का बनू शकणार नाही?
महासत्ता म्हणून आपण काय साध्य केलं पाहिजे यावर हे अवलंबून आहे. आज आपण महासत्ता म्हणून अमेरिका, चीन या देशांकडे बघतो. आपल्याला ह्या देशानं सारखं बनायचं आहे का? हे देश संरक्षण क्षेत्रामध्ये आधाडीवर आहेत. हे देश इतर कुठल्याही देशाला युद्धामध्ये सहज हरू शकतात. जागतिक बाजारपेठेवर ह्या देशांचे वर्चस्व आहे. पण प्रश्न उरतो कि ह्या देशातील लोक आनंदी आहेत का? Source: Shanghai. LMspencer/Shutterstock जर तुम्ही महासत्ता असूनही जर तुमच्या देशातील लोकं जर आनंदी नसतील तर त्या बिरुदाचा काय फायदा? हे म्हणजे तुम्ही खूप श्रीमंत आहात पण तुमच्या कुटुंबातील लोक खुश नाही आहेत. जर तुम्ही World Happiness Index चा रिपोर्ट बघितला तर त्यामध्ये पहिल्या टॉप १० मध्ये जगातील बलाढ्य देश नाहीत. ह्या यादीमध्ये फिनलँड, न्यूझीलंड, नॉर्वे, स्वीडन ह्या देशांचा समावेश आहेत. हे देश लौकिक अर्थाने महासत्ता म्हणून गणले जात नाहीत. पण ह्या देशातील लोक आनंदी आहेत. आनंदी आहेत ह्याचा अर्थ असा नाही कि ह्या देशातील लोक आहेत त्या समाधानी आहेत. तर ते उच्च दर्जाचे जीवन जगतात. मी जेव्हा उच्च दर्जा म्हणतो तेव्हा मला असे म्हणायचे आहे कि ह्या...