महात्मा गांधी यांच्याबद्दल काही लोकांमध्ये गैर समज का निर्माण झाला आहे?

 महात्मा गांधींबद्दल मला माहित असलेले गैरसमज म्हणजे:

१. गांधींनी पाकिस्तान स्वत्रंत झाला तेव्हा त्यांना ५० कोटी देऊ केले.

२. भगतसिंग जेलमध्ये असताना त्यांना सोडवण्यासाठी गांधींनी विशेष प्रयत्न केले नाहीत.

३. महात्मा गांधींमुळे भारतास स्वतंत्र होण्यास अधिक वेळ लागला.

४. महात्मा गांधी हे हिंदू विरोधी होते.

५. महात्मा गांधी हे स्त्रीलंपट होते.

ह्यामध्ये अजूनही काही समज-गैरसमज असू शकतील. हे गैरसमज खूप पूर्वी पासूनचे आहेत... म्हणजे मी अगदी शाळेत असताना ह्या गोष्टी ऐकल्या होत्या ... त्यामुळे social media - फेसबुक व्हाट्सअँप ह्या साधनांना दोष देण्यामध्ये काही अर्थ नाही ... मी शाळेत असताना हि साधने नहोती ... त्यामुळे हे गैरसमज लिखाणातून किंवा चर्चासत्रातून निर्माण झाले असावेत.

ह्या गैरसमजांबद्दल माझं वैयक्तिक मत मी येथे मांडतो.

१. पहिला गैरसमज म्हणजे पाकिस्तान स्वत्रंत झाला तेव्हा त्या देशाला ५० कोटी देऊ केले.

मला हे साधारण १९९५ ते २००० मध्ये समजलं असेल ... जेव्हा हे ऐकलं तेव्हा गांधींचा खूप राग आला होता ... एकतर पाकिस्तान आपल्याला सोडून गेले आणि वर ह्यांनी त्यांना ५० कोटी रुपये दिले ... २० वर्षांपूर्वी ५० कोटी खूप मोठी रक्कम वाटायची कारण त्या काली १०० करोड कमावणारे चित्रपट बनतं नहोते ... ह्यांनी तर ५० करोड १९४७ दिले होते ... ते ५० करोड वापरून आपण खूप प्रगती केली असती ... माझ्या शाळेत सगळ्यांना असच वाटायचं ... तेच सगळे एव्हाना बाप झाले असतील आणि आपल्या मुलांनां हाच इतिहास सांगत असतील ... माझ्यामते गैरसमज अशा प्रकारे पसरतात ...

त्यानंतर एका पुस्तकात एक लेख माझ्या वाचनात आला. त्याच्या लेखकाने पहिल्या दोन गैरसमजाबद्दल विवेचन दिले होते... त्यात अस दिल होत कि इंग्रजांनी भारत स्वतंत्र झाला तेव्हा आपल्याला २०० करोड दिले होते ... त्यातून गांधींनी ५० कोटी पाकिस्तानला द्यायला लावले... हे वाचल्यावर मला गांधींचे काही चुकले असेल असे काही वाटले नाही ... कारण भारताला पण १५० करोड मिळाले होते ...

आपल्याकडे चर्चा करताना १५० कोटी मिळाले होते हे कोणी बोलत नाही ... कदाचित त्यांना माहित नसावं किंवा मुद्दामहून हि गोष्ट लपवली जाते...

२. दुसरा गैरसमज म्हणजे भगतसिंग आणि इतर क्रातींकारी जेलमध्ये असताना त्यांना सोडवण्यासाठी गांधींनी विशेष प्रयत्न केले नाहीत.

मी शाळेत असताना पहिले ते चौथी शिवाजी महाराजांचा इतिहास होता ... त्यामध्ये महाराजांनी बाजीप्रभूं देशपांडे, तानाजी मालुसरे ह्या मावळ्यांचा साथीने युद्ध करून कशाप्रकारे साम्राज स्थापन केले यांची सर्व वर्णन होती ... थोडक्यात action सिनेमासारखं होत सगळं...

त्यानंतर हायस्कूल मध्ये आल्यावर १८५० चा उठाव... तात्या टोपे, राणी लश्मीबाई, मंगल पांडे ह्यांच्या बद्दलचा इतिहास ... म्हणजे पुन्हा action आली ... त्यानंतर लोकमान्य टिळक आले ... जहाल नेतृत्व ... त्यावेळी हे सर्व आवडायचं ... कारण हे लोक दुसऱ्याच्या आरे ला कारे करणारे होते ...

गांधी त्यामानाने मवाळ नेतृत्व... बोअरिंग व्हायचं १९२० नंतरचा लढा शिकताना ... वाटायचं महात्मा गांधी खूप slow आहेत ... खूप वेळ काढत आहेत... पूर्ण पुस्तकांमध्ये क्रांतिकारकांवर खूप कमी धडे असायचे ... पण ह्यांचा मार्ग पटायचा तेव्हा ... सरळ गोळी घालायचे इंग्रजांना ... त्यांना लुटायचे ...

सांगायचा मुद्दा हा क्रांतिकारकांनी हिंसेचा मार्ग स्वीकारला होता कारण त्यांना गांधींचा अहिंसेचा आणि सत्याचा मार्ग मान्य नहोता किंवा वेळखाऊ होता असं वाटतं असेल ... म्हणजेच येथे creative differences आले ... एखाद्याला मी स्विकारलेला मार्ग किंवा धोरणच पटत नसेल तर आपण पण त्या व्यक्तीसाठी कुठे विशेष काही करतो ... आपणपण हेच म्हणतो कि त्याच आणि माझं काही विशेष पटत नाही...

त्या लेखामध्ये ह्या मुद्यांवरसुद्धा चांगलं स्पष्टीकरण दिल होत ... मध्ये खूप वेळ गेल्यामुळे मला ते योग्य प्रकारे मांडता आलेलं नाही

भगतसिंगवर जितके चित्रपट बनले त्यामध्ये सर्वानी गांधींना हा मुद्दा glorify करून व्हिलन दाखवलं आहे ...

३. तिसरा गैरसमज म्हणजे महात्मा गांधींमुळे भारतास स्वतंत्र होण्यास अधिक वेळ लागला.

अस पूर्वी वाटायचं ... आता वाटतं नाही... ह्याच कारण हे आहे कि क्रांतिकारी होण्यासाठी तुमच्यात विशेष गुण असावे लागतात ... एकतर तुम्ही खूप धाडसी पाहिजे ... शस्त्रांचा वापर करता आला पाहिजे ... एखाद्याची हत्या करता आली पाहिजे … ह्या गोष्टी फक्त धाडसी तरुण करू शकतो ...

गांधींनी सर्वसामान्य माणसाला स्वातंत्र लढ्यात समावेश करून घेतले ... शस्त्र काय तर अहिंसा, सत्य आणि प्रेम ... कायदेशीर मार्गाने आंदोलन ... थोडक्यात असा प्रकारच्या लढ्यात कोणीही भाग घेऊ शकत होता ...

एका माणसाच्या शब्दाखातर पूर्ण देशाची जनता रस्त्यावर उतरत होती ... इथे १० लोकांची टीम संभाळताना नाकीनऊ येतात ...

भारतीय स्वात्रंत्र्याला एक विशेष महत्त्व आहे कारण ह्यामध्ये सर्व जनतेचा सहभाग होता ... सविनय आंदोलनाचा वापर करून हा विजय मिळवला होता ... संपूर्ण जग महात्मा गांधीं समोर का झुकत हे आज कळत...

4. महात्मा गांधी हे हिंदू विरोधी होते.

आजही दलित समाजाला मागास समजलं जात... गोष्टी सुधारत आहेत पण 'जात' काही आपल्या देशातून गेलेली नाही ... त्या काळात महात्मा गांधींनी ह्या समाजाला इतर हिंदू समाजाबरोबर समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला ... 'हरिजन' म्हणून उल्लख केला ... हिंदू धर्मामध्ये अजूनही जातीला खूप महत्व दिले जाते ... १०० वर्षांपूर्वी काय परिस्थिती असेल ह्याचा विचार न केलेला बरा ...

गांधींना अपेक्षित असलेला भारत हा हिंदू मुसलमान एकत्र असलेला अपेक्षित होता. त्यामुळे कदाचित ते हिंदू विरोधी होते हा समज पसरला गेला असेल

५. महात्मा गांधी हे स्त्रीलंपट होते.

ह्या विषयाशी संबंधित काही फोटोज social media वर फॉरवर्ड होत असतात ... प्रत्येकाकडे स्वतःचा एक sixth sense असतो ... त्यामुळे मला असा वाटत कि महात्मा गांधी तसे नसावेत ... ह्या विषयावर मी माहिती घेण्याचा कधी प्रयत्न केला नाही.

Note: Images are taken from Google. 

Comments

Popular posts from this blog

What is the Future of Test Cricket?

What is Instructional Design?

How to write a storyboard using Gagne’s Nine Events of instructions