भारत कधीच 'महासत्ता' का बनू शकणार नाही?

महासत्ता म्हणून आपण काय साध्य केलं पाहिजे यावर हे अवलंबून आहे. आज आपण महासत्ता म्हणून अमेरिका, चीन या देशांकडे बघतो. आपल्याला ह्या देशानं सारखं बनायचं आहे का? हे देश संरक्षण क्षेत्रामध्ये आधाडीवर आहेत. हे देश इतर कुठल्याही देशाला युद्धामध्ये सहज हरू शकतात. जागतिक बाजारपेठेवर ह्या देशांचे वर्चस्व आहे. पण प्रश्न उरतो कि ह्या देशातील लोक आनंदी आहेत का?

Source: Shanghai. LMspencer/Shutterstock

जर तुम्ही महासत्ता असूनही जर तुमच्या देशातील लोकं जर आनंदी नसतील तर त्या बिरुदाचा काय फायदा? हे म्हणजे तुम्ही खूप श्रीमंत आहात पण तुमच्या कुटुंबातील लोक खुश नाही आहेत.

जर तुम्ही World Happiness Index चा रिपोर्ट बघितला तर त्यामध्ये पहिल्या टॉप १० मध्ये जगातील बलाढ्य देश नाहीत. ह्या यादीमध्ये फिनलँड, न्यूझीलंड, नॉर्वे, स्वीडन ह्या देशांचा समावेश आहेत. हे देश लौकिक अर्थाने महासत्ता म्हणून गणले जात नाहीत. पण ह्या देशातील लोक आनंदी आहेत. आनंदी आहेत ह्याचा अर्थ असा नाही कि ह्या देशातील लोक आहेत त्या समाधानी आहेत. तर ते उच्च दर्जाचे जीवन जगतात. मी जेव्हा उच्च दर्जा म्हणतो तेव्हा मला असे म्हणायचे आहे कि ह्या देशात बेरोजगारी कमी आहे, आरोग्य सेवा चांगल्या दर्जाच्या आहेत. थोडक्यात, अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या गरजा त्यांना उत्कृष्ट दर्जाच्या मिळतात.

Source: Google

भारत फक्त तेव्हाच महासत्ता बनेल जेव्हा देशातील लोक आनंदी होतील. आणि हे खूप कठीण काम आहे. त्यामध्ये मुख्य अडथळा आहे आहे आपली प्रचंड लोकसंख्या. आपल्या देशाची आज मुख्य समस्या काय आहे? बेरोजगारी. लोकांकडे आज रोजगार नाही आहे त्यामुळे ते आपल्या कुटुंबाला उच्च दर्जाचे राहणीमान देऊ शकत नाही. ज्यांच्याकडे नोकरी किंवा रोजगार आहे त्यांना वेतन कमी प्रमाणात मिळते. त्यामुळे आपल्या देशामध्ये श्रीमंत आणि गरीब ह्यामध्ये खूप मोठी दरी आहे. वेगवेगळ्या पक्षांची सरकारे येऊन सुद्धा बेरोजगारीची समस्या कोणीही सोडवू शकलेले नाही आणि सोडवू शकणार पण नाही. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करणे हि काही सोपी गोष्ट नाही. रोजगार निर्माण केला तरी वेतन तुटपुंजे मिळते त्यामुळे लोक जे काम करतात त्यामध्ये खुश नसतात.

Source: Google

जर लोकसंख्या अशाच प्रमाणात वाढत राहिली तर रोजगाराची समस्या अशीच वाढत राहणार आहे. त्यामुळे आपण आभासी महासत्ता बनू शकतो पण खरोखरची महासत्ता बनू शकत नाही.

Comments

Popular posts from this blog

What is the Future of Test Cricket?

What is Instructional Design?

How to write a storyboard using Gagne’s Nine Events of instructions